आदिवासी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था-अहमदनगर

  • आदिवासी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था-अहमदनगर ही एक सामाजिक संस्था आहे व सर्व हक्क संस्थेकडे राखीव आहेत.
  • संस्थेकडे आलेली आपली माहिती ही पूर्णपणे गोपनीय राहील याची खबरदारी घेण्यात आलेली आहे, तरीही संस्थेच्या वेबसाईटवर बायोडाटा टाकताना स्वतःच्या जबाबदारीवरच टाकावा.
  • संस्थेचा वधूवर विभाग सुरू करण्याचा उद्देश 'वधूवर परिचय' हा असल्याने एखाद्या स्थळाबद्दल परिचय झाल्यानंतर स्थळासंबंधी सखोल माहिती घेणे, खातरजमा करणे,लग्न जमविणे इ. जबाबदारी सर्वस्वी आपली स्वतःची राहील. त्यास कुठल्याही प्रकारे संस्था जबाबदार असणार नाही.
  • मुलींनी बायोडाटा टाकताना संपर्कासाठी पालकांचाच फोन नंबर द्यावा, स्वतःचा नंबर देऊ नये.
  • वधूवर पसंती ,नापसंती ही ही जबाबदारी पूर्णपणे स्वतःची राहील त्यास संस्था जबाबदार असणार नाही.
  • एक बायोडाटा एकदाच द्यावा.
  • वधूवर पसंती नंतर आपला विवाह जमल्यावर लगेच संस्थेला कळवणे, म्हणजे यादीतील आपले नाव कमी करता येईल.
  • वयाची अट - नोंदणी अर्जासाठी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण व मुलाचे वय 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचे लग्न पाहणी करीता योग्य असलेले दोन फोटो – एक पासपोर्ट साईज फोटो व एक फुल साईज फोटो अपलोड करावे. फोटो सरळ असावा. (आडवा फोटो , सेल्फी फोटो , गॉगल लावलेला , फेटा बांधलेला , टोपी असलेलला फोटो अपलोड करु नये. फोटो मध्ये एकच व्यक्ती दिसणे आवश्यक आहे. इतर व्यक्ती ,वस्तु दिसता कामा नये.)
  • दुर्धर आजार अथवा शारिरीक व्यंग जन्मजात अथवा अपघाताने आलेले.याचा उल्लेख बायोडाटात असावा.
  • एखाद्या उमेदवाराविषयी पसंती दर्शवल्या नंतर त्यासंबंधी डिटेल्स आपणास संस्थेकडून दिले जातील .आपणास परस्पर संपर्क साधता येणार नाही.
  • बायोडाटा दिल्यानंतर संस्थेमार्फत लग्न जमेलच असे गृहीत धरू नये, त्यास संस्था जबाबदार असणार नाही